परभणी;किर्तनकार जगन्नाथ हेंडगेंना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार,आमदार सरसावले

Spread the love

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी).तालूक्यातील झिरोफाटा येथील बाळकृष्ण हायटेक रेसिडेंसीयल स्कुलच्या संस्थाचालक पती पत्नीने शैक्षणिक शुल्कासाठी केलेल्या मारहाणीच्या घटनेत मृत्यू पावलेल्या किर्तनकार जगन्नाथ महाराज हेंडगेंना न्याय मिळवून देण्यासाठी परभणीचे उबाठाचे खासदार संजय उर्फ बंडु जाधव तसेच आमदार डॉ राहुल पाटील सरसावले असून, त्यांनी मयत हेंडगे महाराजांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन आश्वस्थ करत मुजोर संस्थाचालकास शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची भुमिका जाहीर केली. ता. १० जुलै रोजी उखळद येथील हभप जगन्नाथ हेंडगे यांना संस्थाचालक पती पत्नीने केलेल्या बेदम मारहाणीत पालकाचा मृत्यू झाला होता.यानंतर, विद्यार्थीनीचे पालक मारहाणीत मृत्यू पावल्याची माहिती मिळताच संस्थाचालक पती पत्नी‌ भितीमुळे पसार झाले.ते अजूनही फरारी असून पूर्णा पोलिसांच्या हाती लागले नाहीत.दरम्यान,सदर घटनेचे गांभीर्य घेताच परभणीचे उबाठा शिवसेना गटाचे लोकप्रिय खासदार संजय जाधव, आमदार डॉ राहूल पाटील यांनी उखळद गावी जावून गावकऱ्या समवेत मयत जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटूंबाचे सांत्वन केले.यावेळी,खा.संजय जाधव यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत हायटेक रेसिडेंसीयल स्कुलचे संस्थाचालक पती पत्नी यांच्या राक्षशी वृत्तीवर खरपूस समाचार घेत त्यांना पोलीसांनी तात्काळ अटक करावी व त्यांच्या शिक्षणसंस्थेवर सत्ताधारी सरकारने निर्बंध आणावेत असे सुतोवाच केले.वारकरी सांप्रदयातील किर्तनकार प्रवचनकार व्यक्तीमत्वाचा खून होणे ही अतिशय क्रूर घटना आहे.ती शिक्षणसंस्था कायमची बंद झाली पाहिजे. असी मागणी शिक्षण मंत्र्यांकडे करणार असुन, सोमवारी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनाही भेटून आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे.अशी ठाम भूमिका गावकऱ्या समवेत घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.मारहाण करणारे सदर शिक्षणसंस्था चालकावर अनेक गुन्हे नोंद आहेत..त्या शिवाय असे काही बरेच काळे कारनामे केल्याचे सर्वज्ञात आहे.त्यामुळे मुजोर संस्थाचालकास शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही खा.जावध म्हणाले.यावेळी परभणी विधानसभेचे उबाठाचे आमदार डॉ.राहूल पाटील यांनी देखील मयत ह.भ.प जगन्नाथ महाराज हेंडगे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.यानंतर त्यांनी प्रकरणाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, सदर घटना प्रकरणी मी विधानसभेत बाळकृष्ण हायटेक शिक्षण संस्थाचालकांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रश्न उपस्थित करुन सरकारला न्यायासाठी जाब विचारणार आहे.दरम्यान,१३ जुलै रविवार रोजी सायंकाळी ८ वाजता उखळद येथे गावकऱ्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची जगन्नाथ महाराज हेंडगे यांना न्याय मिळवून देण्यासाठी महा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page