किर्तनकार जगन्नाथ महाराज हेंडगे खुन प्रकरण;आरोपीस अटक करुन संस्थेची मान्यता रद्द करा-स्वराज्य पक्षाचा ईशारा

Spread the love

पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)

किर्तनकार जगन्नाथ महाराज हेंडगें खुन प्रकरणानंतर जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.तर उबाठा पाठोपाठ आता स्वराज्य पक्ष ही मैदानात उतरला.सोमवार ता.१४ रोजी स्वराज्य पक्षाच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना निवेदन देत झिरोफाटा येथील बाळकृष्ण हायटेक रेसिडेन्सीयल स्कुलचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीस तातडीने जेरबंद करुन त्यांच्या शैक्षणिक संस्थेची मान्यता शासनाने रद्द करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा ईशाराही दिला आहे.परभणी तालुक्यातील मौजे उखळद येथिल किर्तनकार,स्व. जगन्नाथ महाराज हेंडगे हे मुलीची टि.सी.आणण्यासाठी झिरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत गेले होते.दरम्यान शाळेच्या संस्था चालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी हीने काही पैशासाठी बेधम मारहाण करून त्यांचा खुन केला.यानंतर पुर्णा पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु घटना घडून ५ दिवसांत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नाही.त्यांना तातडीने जेरबंद करून कठोर शासन करावे तसेच त्यांच्या संस्थेची व बेनामी संपत्तीची उच्च स्तरीय चौकशी करून संस्थेची मान्यता तात्काळ रद्द करावी.अन्यथा स्वराज्य पक्षाच्या वतीने तिव्र अंदोलन करण्यात येईल.असा ईशाराही यावेळी निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर स्वराज्य पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव कल्याणकर, ता.अ.गणेश बुचाले, माऊली कदम आदींसह पदाधीका-यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page