पूर्णा तालुक्यात ७९ ग्रा.पंच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर
४१ गावात दिग्गज गावपुढा-यांना हाकावा लागणार पडद्यामागुन गावगाडा;कही खुशी कही गमचे चित्र
पूर्णा ता.१४/प्रतिनिधी
तालुक्यात २०२५ ते २०३० या कालावधीतील पार पडणाऱ्या ग्रामपातळी वरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या व शेकडो ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी ता.१४ जुलै रोजी पूर्णा तहसील कार्यालयामध्ये काढण्यात आली असून ७९ ग्रामपंचायत पैकी ५० टक्के म्हणजे तब्बल ४१ ग्राम पंचायतीचे सरपंच पद हे महिलांसाठी राखीव निघाले असून,sc महीला साठी ६ तर obc साठी ११ आणी open साठी २३ तसेच st महीला १ असं आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे आता गाव पातळीवरील अनेक दिग्गजांच्या गावात महीला राज येणार आहे. यामुळे आता अनेक पुढा-यांना आता आपल्या सहचरणीच्या हातामध्ये सरपंच पदाची दोरी देऊन पडद्यामागून सरपंच पदाचा गाडा हाकावा लागणार असल्याचे चित्र आहे.दरम्यान सरपंच पदाचे आरक्षण सुटल्यामुळे आता गाव पातळीवर आगामी काळात लवकरच निवडणूक आयोग निवडणुका घेणार असल्यामुळे आरक्षण लागू झाल्यानंतर निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महत्त्वाचा घटक असलेला गाव पातळीवरील ग्रामपंचायत ही सर्वात महत्त्वाची मानली जाते.राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आगामी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक काळात राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहेत .यामध्ये पूर्णा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने जनतेतून निवडून द्यावयाच्या सरपंचपद आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत . त्यानुसार सोमवारी १४ रोजी येथिल तहसील कार्यालयात ११ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गावपुढा-यांची बैठक बोलावण्यात आली होती. याबैठकीस तहसीलदार माधवराव बोथीकर ,नायब तहसीलदार (निवडणूक) ,पंढरीनाथ शिंदे यांच्यासह तालुक्यातील गाव पुढारी आजी माजी लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.सहाय्यक महसूल अधिकारी व्यंकटेश जज्जरवार, उज्वला पुल्लेवार,महसूल सहायक राधा चांदणे,महसूल सेवक नामदेव कळसाईतकर, साईनाथ दाढे, पांडुरंग वसमतकर, नवनाथ भालेराव यांनी काम काम पाहिले.
१२ गांवे नामाप्र (SC) प्रवर्गासाठी राखीव
कातनेश्वर, खरबडा,आडगांव(ला), गोविंदपुर/मरसुळ,ईठलापूर, संदलापुर ही गांवे SC स्त्रियांसाठी राखीव करण्यात आली आहे.तर पिंपळगाव सारंगी, भाटेगांव,धनगर टाकळी, कानडखेड, सोन्ना,दगडवाडी तर जळगांव/कळगांववाडी ST स्त्रीसाठी राखीव असणार आहे.
२१ गांवे नामाप्र (OBC) प्रवर्गासाठी राखीव
रेगांव,गौर,हिवरा(बु),माखणी,पिंपरण,बलसा , धानोरा मोत्या,गोळेगांव,चुडावा, एकरुखा, पिंपळा भत्या, ही ११ गावे ओबीसी महीला तर पिंपळा (लो), आलेगांव,कान्हेगांव,कावलगांव, नावकी,फुकटगांव ,शिरकळस,खडाळा ममदापूर,सोनखेड,ही १० गावं सर्वधारण OBC साठी राखीव असणार आहेत.
४५ गावांत सरपंचपद(OPEN) खुल्या प्रवर्गासाठीआरक्षीत
बानेगाव,माहेर,दस्तापूर,आव्हई,बरबडी,देगांव,एरंडेश्वर,हाटकरवाडी,कलमुला,लोण(खु),महागाव,मजलापूर,सुहागण,आहेरवाडी,चांगेफळ,लक्ष्मणनगर,पांग्रा लासिना, आडगाव सुगांव,धोत्रा,कमलापूर,सातेफळ, न-हापूर,सुरवाडी, ताडकळस,वाई लासिनाया ग्रामपंचायतीच्या चाव्या आता open प्रवर्ग महिलांच्या हाती असणार आहेत.तर उर्वरित वाई लासिना,पिपंळगाव बाळापूर, मुंबर,अजदापूर, कंठेश्वर/ सातेगाव, देऊळगाव दुधाटे,लिमला,वझूर, फुलकळस, धानोरा काळे,कावलगांव,पेनूर पिंपळा लिखा रुंज,रुपला सुकी खांबेगाव /महातपुरी खुजडा माटेगाव,निळा,देवठाणा, कौडगाव ही गावं open प्रवर्गासाठी असणार आहेत.












