हभप.जगन्नाथ महाराज खुन प्रकरण;जिल्हा कचेरीवर धडकला जनआक्रोश मोर्चा..
हायटेक शाळेच्या मुजोर संस्थाचालकाच्या अटक करा;उखळद ग्रामस्थांसह वारकऱ्यांचा सहभाग
पूर्णा ता.१५(प्रतिनिधी)
किर्तनकार हभप.जगन्नाथ महाराज हेंडगे यांच्या झिरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत झालेल्या मारहाणीच्या घटनेत मृत्यू प्रकरणानंतर संतापलेल्या वारकरी संप्रदाय व उखळद येथील हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी झिरोफाटा येथील हायटेक रेसीडेंन्सीयल संस्थेचे मुजोर संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीस अटक करावी ,शाळेची मान्यता रद्द करावी या मागणीसाठी मंगळवारी (ता.१५) रोजी जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढुन आपला संताप व्यक्त केला.
पूर्णा तालुक्यातील झिरोफाटा बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत तीसरीत शिकणाऱ्या आपल्या मुलीची टिसी काढण्यासाठी हभप. जगन्नाथ महाराज हेंडगे (ता.१०) जुलै रोजी शाळेत गेले होते. मात्र यावेळी संस्था चालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी केलेल्या बेधम मारहाणीत हभप. जगन्नाथ महाराज हेंडगे यांचा मृत्यू झाला. सदर प्रकार अत्यंत निंदणीय असल्याने सर्वस्तरातून निषेध करण्यात येत आहे.घटनेच्या निषेधार्थ मंगळवार (ता.१५) जुलै रोजी कृष्णा गार्डन येथून जिल्हा कचेरीवर पर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रामुख्याने मयत जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटूंबातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे, सृष्टी जगन्नाथ हेंडगे यांच्या सह , किर्तनकार हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर, गंगाप्रसाद आणेराव, शिवाजी भोसले,दिपक केदार,आनंदराव भरोसे, सुरेश सुमारे, सुभाषराव जावळे पाटील, प्रेरणाताई समशेर वरपूडकर, कचरु गोडबोले, ज्ञानेश्वर जोगदंड, गजानन जोगदंड, गणेश हेंडगे, भामोतीराम हेंडगे, गंगाधर हेंडगे, भास्करराव हेंडगे, उत्तमराव हेंडगे, आदींसह ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.यामोर्चानंतर अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांना मोर्चेकऱ्याच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले.निवेदनात फरार मुजोर संस्थाचालक दांम्पत्यास तातडीने अटक करावी,संस्थेवर कार्यवाही करुन संस्था बंद करावी, मयताच्या कुटूंबास ५ कोटी पेक्षा अधिक आर्थिक मदत देऊन मयताच्या भावास शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.या जनआक्रोश मोर्चा नंतर प्रशासन संबंधित मुजोर संस्थाचालक यास कधी अटक करते,त्यांच्या शाळेची मान्यता रद्द कधी करते मयताच्या नातेवाईकांना मदत जाहीर कधी करते याकडे लक्ष लागले आहे.












