रा.काॅ.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शनिवारी परभणीत
परभणी,ता.१८(प्रतिनिधी)
ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अनुषंगाने, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)पार्टीने पूर्वतयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे शनिवारी ता.,१९ जुलै रोजी परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात दुपारी २ वाजता परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन, यावेळी प्रदेशाध्यक्ष सूनिल तटकरे हे निर्धार नवपर्वाचा या ब्रीदवाक्यांतर्गत कार्यकर्ता मेळावा व पदाधिकारी संवाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पक्ष संघटना, सभासद नोंदणी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. कार्यक्रमात परभणी शहर महानगरपालिका, तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, जिल्हा परिषद व नगरपालिका यांची तालुकानिहाय माहिती घेतली जाणार आहे. आगामी निवडणुकांतील पक्षाची भूमिका, इच्छुक उमेदवारांची तयारी आणि संघटनात्मक आढावा या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.या मेळाव्यास परभणी जिल्ह्यातील सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, माजी महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, मार्केट कमिटी सभापती व सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची उपस्थिती अपेक्षित आहे. या महत्वपूर्ण बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर व शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.












