Parbhani ;१ ते १५ ऑगस्ट दरम्यान दुधभेसळ तपासणी मोहीम प्रशासनाकडून कारवाईचे संकेत..!

Spread the love

परभणी ता.३०(प्रतिनिधी)

परभणी जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कपूर यांच्या दि. 28 रोजी झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार, दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी (Parbhani Food and Drugs) जिल्हास्तरीय समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. बैठकीत निर्णय घेण्यात आला की, १ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्यात येईल.

यावेळी बैठकीस समिती सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी शिवाजी गिनगीने, समिती सदस्य तथा सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अनंत चौधरी, समिती सदस्य तथा उपआयुक्त पशुसंवर्धन केशव सांगळे, उपनियंत्रक वैधमापन तथा समिती सदस्य गंगाधर कांबळे उपस्थीत होते.आगामी काळातील सण व पावसाळ्याचे दिवस असल्याने दुध व दुग्धजन्य पदार्थ यांची शुध्दता तपासणी करणे व इतर अपायकारक पदार्थाची भेसळ होणार नाही याबाबत दक्षता घेणे व वेळोवेळी जिल्ह्यातील सर्व अस्थापनांची तपासणी करुन भेसळ केल्याचे आढळून आल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायदा-२००६ अंतर्गत कलम २६ (२), कलम ५२ व ५९ नुसार दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत समिती अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी समिती सदस्यांना सुचना दिल्या.बनावट पनीर उत्पादन/विक्री करण्यास प्रतिबंध असुन नागरीकांना स्वच्छ, निर्भेळ व गुणवत्तापुर्वक दुध दुग्धजन्य पदार्थ मिळण्याच्या दृष्टीकोणातुन जिल्हास्तरीय गठीत समितीमार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ करणा-या दुध व दुधजन्य पदार्थ उत्पादक, संकलन केंद्रावर व वितरकावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यामध्ये दि. १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तपासणी धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.तरी जिल्हास्तरीय गठीत समितीने दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे आढळुन आल्यास टोल फ्री क्रमांक 9923689168, 9049518711 यावर जिल्हास्तरीय समितीच्या निदर्शनास आणुन देण्याचे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
-*

You cannot copy content of this page