Tadkalasअवैध रेती वाहतुकीचा पिकअप पोलिसांनी पकडला

Spread the love
ताडकळस/प्रतिनिधी
ताडकळस पोलीसांच्या हद्दीतील राहाटी शिवारात अवैध रित्या रेतीची वाहतुक करत असलेल्या एका पिक अपला पोलीसांनी पकडले असुन ताडकळस पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी की,राही शिवारात अवैध रित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती काढून ताडकळस पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अवैध रेती वाहतुक करणार्‍या वाहनांवर कारवाई करून गुरूवारी (ता.३१) ताडकळस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राहटी येथील मारोती मंदिर परिसरात गुरूवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास आरोपी अल्ताफ शफिक शेख (वय २३) रा.मुसलमान वाडी नांदेड हल्ली मुक्काम धार रोड परभणी याच्याकडून विना नंबरची बोलेरो पिकअप वाहन व वाहनातील अंदाजे १ ब्रास रेती असा एकून ३ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिस अंमलदार राहुल वडमारे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस जमादार अप्पाराव वर्‍हाडे करीत आहेत.
                                  

You cannot copy content of this page