पूर्णा, ता.१ (प्रतिनिधी)
येथील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे (Indira Gandhi Jr.College Purna)प्राचार्य पंडित रणवीर यांच्या कार्य गौरव सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (ता.३१) करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ.मोहनराव मोरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, पद्मिनीताई मोरे, प्राचार्य रजनीताई मोरे, संपादक संतोष पांडागळे, प्राचार्य डॉ.केशव जोंधळे, प्रसिद्ध कवी डॉ.केशव खटींग,प्रा. संजय मुलगीर, उद्धव शिंदे, प्रा.शिवाजी रणवीर, सत्यनारायण रणवीर, विजय बगाटे, नानासाहेब भालेराव, डॉ.गुलाब रणवीर यांची उपस्थिती होती.यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती प्राचार्य पंडित रणवीर व प्रा. वैशाली रणवीर यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांचा संस्थेच्या व विविध पक्ष संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष पंडागळे यांनी प्राचार्य रणवीर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत शिस्त, विषयज्ञान व विद्यार्थ्यांच्या मनात घर करणाऱ्या संवेदनशील स्वभावामुळे सन्मानास पात्र ठरल्याची भावना व्यक्त केली. यावेळी बोलताना प्राचार्या मोहनराव मोरे म्हणाले की, प्रामाणिकपणे व निष्ठेने समर्पित भावनेतून त्यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले असे गौरवोद्गार काढले.प्रसिद्ध कवी डॉ केशव खटींग म्हणाले, आमच्या जडणघडणीत व आमच्या भाषा समृद्धीत रणवीर सरांचे मोठे योगदान आहे. प्रास्ताविक ज्ञानोबा भेंडेकर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीधर घुले यांनी केले. नरहरी फड यांनी आभार मानले.