Purnaश्रीगुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याची जयंती साजरी

Spread the love
पूर्णा ता.१(प्रतिनिधी)श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयामध्ये शाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी साहित्यसम्राट अण्णा साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर डॉ.शिवसांब कापसे, डॉ.संजय दळवी, डॉ. शेषेराव शेटे,डॉ. बालासाहेब मुसळे, डॉ.कार्यालयीन अधीक्षक श्री बाळासाहेब कुलकर्णी,श्री गिरीष शिवणकर, डॉ.सोमनाथ गुंजकर यांची उपस्थिती होती. शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्व आजच्या विदयार्थ्यांसाठी किती प्रेरणादायी आहे त्यांचे विपुल साहित्य समाजाच्या विकासासाठी फार मोलाचे स्थान आहे. याप्रसंगी डॉ. पुष्पा गंगासागर व डॉ. ओमकार चिंचोले यांनी शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राजू शेख यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page