परभणी,ता.१(प्रतिनिधी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Parbhani Annabhau Sathe Jayanti)यांच्या जयंती दिनी परभणीत समाजबांधवांनी मोठ्या हर्षोल्लासात वाजत गाजत प्रतिमेची मिरवणूक काढुनी अभिवादन केले.यावेळी अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी सर्व स्तरांतील नागरिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती.
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्ताने शुक्रवारी (ता.१) सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंत विविध पक्ष, संस्था, संघटना व प्रतिष्ठाणांच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी, नागरीकांनी साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.येथील बसस्थानक, रेल्वेस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच मध्यवस्तीतील छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ कॉर्नर या परिसरात स्वागत कमानीसह मोठमोठे हार्डिंग्ज उभारण्यात आले होते. तर पुतळा परिसरात सुशोभिकरणासह सुंदर अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे हा परिसर उजळून निघाला.
परभणी शहरातील बसस्थानक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परिसरात शुक्रवारी १ रोजी जयंती महोत्सवाच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली होती.दरम्यान, साठे यांच्या प्रतिमेची विविध संघटना व संस्थांद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत मोठ्या संख्येने पुरुष, महिला व युवक सहभागी झाले होते. फेटेधारी पुरुष, महिला व युवकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंत विविध पक्ष, संस्था, संघटना व प्रतिष्ठाने व मंडळांच्या पदाधिकार्यां सह कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य नागरीकांनी या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत भावपूर्ण असे अभिवादन केले.