Parbhani Ashapura Hondaदुचाकी खरेदीत ग्राहकांची फसवणूक विक्रेत्यास १ लाखांचा दंड
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निकाल;विविध शुल्कांच्या नावाखाली जादा पैसे उकळणे पडले महागात
परभणी,ता.२(प्रतिनिधी)दुचाकी खरेदीत ग्राहकांची फसवणूक करत विविध शुल्कांच्या नावाखाली जादा पैसे उकळणे परभणी येथिल आशापुरा होंडाला मोटर्सला (Parbhani Ashapura Honda)चांगलेच महागात पडले असुन पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथिल एका ग्राहकांच्या तक्रारींवरजिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आपला निकाल देत विक्रेत्याने अतिरिक्त रक्कम व्याजासह परतीचे तसेच मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये, तक्रारीच्या खर्चापोटी १५ हजार रुपये द्यावेत, तसेच ग्राहक कल्याण निधीत १ लाख रुपये दंड भरावा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील शेतकरी सोनाजी मारोती परडे यांनी परभणीतील आशापुरा मोटर्स येथून होंडा युनिकॉर्न मोटारसायकल २३ सप्टेंबर २०२३ रोजी खरेदी केली. सदरील मोटार सायकलचा नोंदणी क्रमांक एम.एच. २२/ व्ही.बी.१९३५ असा आहे. त्यावेळी वाहनांच्या किंमती व्यतिरिक्त विमा, एक्सडेंटेड वॉरंटी, कोटींग आणि अॅक्सेसरीजसाठी अतिरिक्त रक्कम आकारली, अनावश्यक खर्चास पारडे यांनी नकार दिला, तेव्हा या डिलरने वाहन द्यावयास टाळाटाळ केली. ती अतिरिक्त रक्कम द्यावयास भाग पाडले, त्यावेळी अनेक बाबींची बिले,बिलांबाबत आवश्यक माहिती व पावत्या सुध्दा दिल्या नाहीत. काही दिलेल्या बिलांवर जीएसटीचा नोंदणी क्रमांकही नाही.आरटीओ शुल्का साठी त्यांच्याकडून १ हजार ३२२ रुपये जास्तीचे घेतले. या सर्व अन्यायाच्या विरोधात पारडे यांनी जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली.अॅड.राजेश एन.जैन यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात १३ मे २०२४ रोजी तक्रार आयोगाकडे एक दाखल केली.
ग्राहक आयोगाने या प्रकरणात सूनावनीत सखोल चौकशी करीत दोन्ही बाजूंचे म्हणणे येकून घेतले.तक्रारदारांच्या वतीने जैन यांनी आयोगासमोर विक्रेत्या च्या चुकीच्या कार्यपध्दतीचे नमूने निदर्श नास आणून दिले. ग्राहकाला सक्ती करणे ही फसवणूक केवळ एका ग्राहकापुरती मर्यादित नाही, ही एक व्यापक समस्या असल्याचेही स्पष्ट केले.संबंधित आशापुरा मोटर्स या डिलरवर ग्राहकांना अनावश्यक वस्तू आणि सेवा द्यावयास भाग पाडल्या बद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा निर्णय दिला आहे.












