Parbhani Purna शहीद भगतसिंग यांच्या स्मारक उभारण्यासाठी सोन्ना गावात गोविंद कदमांचे उपोषण सुरू

Spread the love

उपोषणाचा चौथा दिवस;प्रकृती खालावली; प्रशासनाने तोडगा काढावा सामाजिक संघटनांची मागणी..

पूर्णा ता.३ (प्रतिनिधी)देशासाठी प्राणांची आहुती देणारे थोर देशभक्त शहीद भगतसिंग(Shaheed Bhagat Singh)यांचे भव्य स्मारक परभणी जिल्ह्यात व्हावे तसेच त्यांच्या नावाने एखादे वाचनालय सुरू व्हावे या मागणी करिता पूर्णा(Parbhani Purna News)तालुक्यातील गोविंद कदम नामक तरुण मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे.प्रशासनाने याप्रकरणी तातडीने तोडगा काढावा अशी मागणी सामाजिक संघटनांच्या वतीने केली जात आहे.  पूर्णा तालुक्यातील सोन्ना गावातील तरुण कार्यकर्ते गोविंद ग्‍यानोजी कदम मागील अनेक वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये शहीद भगतसिंगांचे स्मारक व्हावे यासाठी शासन दरबारी खेटे घालत आहेत. करता त्यांनी पूर्णा तहसील कार्यालय, परभणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मंत्रालयापर्यंत आपली मागणी वेळोवेळी निवेदनाद्वारे पोहोचवली आहे. असे असताना प्रशासनाकडून या मागणीचा कोणताही विचार न झाल्याने अखेर निवेदनात नमूद केले प्रमाणे त्यांनी (ता.३१) जुलैपासून अन्नत्याग, जलत्याग करीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान त्यांच्या या मागणीला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. परंतु उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. काल शनिवार पासून त्यांची तब्येत अत्यंत खालवली आहे.

प्रशासनाचे आवहान...
गोविंद कदम राहणार सोन्ना हे मागील चार दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांची मागणी आम्ही शासन दरबारी पाठवली असून ,पत्रव्यवहार सुरू केला आहे.त्यांच्या मागण्या बाबत शासनस्तरावरून काय निर्णय होतो तो त्यांना कळवण्यात येईल. त्यांची मागणी शासनस्तरावरून पुर्ण होईल अशी आशा आहे. तरी उपोषणार्थी गोविंद कदम यांनी उपचार घ्यावा. आपले उपोषण तुर्तास तरी थांबवावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page