पूर्णेतील पवार महाविद्यालयात जिल्हा ‘ड’ झोन शरीरसौष्ठ स्पर्धा संपन्न

Spread the love
पूर्णा ता.५(प्रतिनिधी)येथिल स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालय व स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हा 'ड' झोन शरीरसौष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव, प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार तर मंचावर डॉ. गोमचाळे यांच्या सह डॉ.चंद्रकांत सातपुते, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास आणि शारिरीक सुदृढतेसाठी आपल्या दिवसभराच्या वेळेतील किमान आपले २ तास जरी मैदानावर दिले तरच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि जीवन समृद्ध बनते असे प्रतिपादन डॉ.मीनानाथ गोमचाळे यांनी केले.तर डॉ. चंद्रकांत सातपुते यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी परभणी श्री.शिवाजी महाविद्यालयाचा श्रावण गणहिरे(प्रथम) गंगाखेड श्री.संत जनाबाई महा विद्यालयाचा शे.बागवान जिशान (द्वितीय),पूर्णा श्री.गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचा साईनाथ भंगे(तृतीय) क्रमांक मिळविला.यास्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण शेख मोहम्मद व शंभू गायकवाड यांनी केले.डॉ.मीनानाथ गोमचाळे, डॉ.विनोद गणाचार्य, डॉ.चंद्रकांत सातपुते, डॉ.माधव कदम,डॉ.अशोक चाटसे ,डॉ.सतीश बरकुंटे आदींनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.भारत चापके सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय कसाब तर आभार डॉ.संतोष कुर्‍हे यांनी मानले.या स्पर्धेमध्ये विद्यार्थी स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

You cannot copy content of this page