Purna रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी वयोवृद्ध ईसमाचा मृतदेह
पूर्णा रेल्वे स्थानकावरील घटना; लोहमार्ग पोलीसांत घटनेची नोंद
पूर्णा ता.९(प्रतिनिधी)
Purna Railway Station News;येथिल रेल्वे स्थानकांवर एका ६० वर्षीय अनोळखी वयोवृद्ध ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी (ता.९) रोजी उघडकीस आली असून, याप्रकरणी लोहमार्ग पोलीसांत घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आहे. पूर्णा रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर शनिवारी पहाटेच्या सुमारास ऐन दाद-याच्या खाली अंदाजे एक ६० वर्षीय वयोवृद्ध ईसम मृतावस्थेत पडलेल्या अवस्थेत दिसून आला.घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.स्थानिक स्टेशन मास्तर, यांनी लोहमार्ग पोलीसांना घटनेची माहिती दिली.लोहमार्ग पोलीस दलाचे पोहेकाॅ.सिद्धेश्वर देशमाने रेसुबलाचे जवान गुड्डू मीना आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला असता,मयताकडे ओळख पटण्यासारखे काहीही आढळून आले नाही. पोलीसांनी वर्णील्यानुसार तो पाच फुट पाच इंच, डोक्याचे दाढीचे पांढरे केस,गो-या रंगाचा, लांबट चेहरा असलेला,अंगात पांढरा चौकडा शर्ट तसेच निळा पॅन्ट घातलेल्या वर्णणाचा आहे.सदरील इसमाच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.सदरील ईसमाचा मृत्यू हा नैसर्गिक पद्धतीने दिर्घ आजारी असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत असल्याचे सांगितले.मृतदेह येथिल ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून ओळख पटवण्यासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयाच्या शितगृहात ठेवण्यात आला असून वरील वर्णनाचा ईसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास लोहमार्ग पोलीस चौकी पूर्णा यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन पोहेकाॅ. सिद्धेवर देशमाने यांनी केले आहे.












