पूर्णेत आ.डॉ. गुट्टे यांचा अभिष्टचिंतन सोहळा; भव्य रक्तदान शिबीरात १०० हुन अधिकांनी केलं रक्तदान..!
पूर्णा ता.१३(प्रतिनिधी)गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पुर्णा शहर व तालुक्यातील आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासह फळवाटप, साडीवाटप, कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी १०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून नेत्याप्रती आपली निष्ठा व कृतज्ञता व्यक्त केली.

आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त पुर्णा शहरासह तालुक्यात कावलगांव येथे मंगळवारी (ता.१२) रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तालुका प्रभारी नितीन (बंटी) कदम, तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई,शहराध्यक्ष अॅड. राजेश भालेराव यांनी केले होते.यावेळी कार्यक्रमास डॉ विनय वाघमारे, डॉ गुलाब इंगोले, लक्ष्मीकांत कदम, नंदकुमार डाखोरे,हाजी कुरेशी,गिताराम देसाई, महादजी देसाई, हरिभाऊ कदम,अनिल खर्गखराटे, हर्षवर्धन गायकवाड, मधुकर गायकवाड, अरुण वाघमारे, विकास गव्हाळे, सुदर्शन ढोणे, गोविंद राव आवरगंड, उत्तमराव ढोणे, साहेब भाकरे, विनायक पवार, सैनाजी माठे, दाजीबा भोसले, खंडोजी पवार, प्रभाकर डाखोरे, जगन्नाथ रेनगडे, विश्वनाथ होळकर, व इतर पदाधिकाऱ्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. रक्ताचे संकलन जिल्हा रुग्णालय पथकाने केले. डॉ. दिपाली जाधव, आत्माराम जटाळे, विठ्ठल शिंदे, संजय वाघमारे, न्नितीन लिपने, शेख सलीम, संदीप देशमुख, मानोज शिरगजवार आदींनी सेवा दिली. यानंतर आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनीही शिबिरास भेट देत कार्यकर्त्यांचे कौतुक केले.सायंकाळी आ..डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळीवाडा येथे किशोर सूर्यवंशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साडी वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












