बेकायदेशीर मांस विक्रीचे दुकान बंद करा;पुर्णेतील २ डाॅक्टरांचे पालीकेसमोर उपोषण
पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)
येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर नागरी वसाहतीत बेकायदेशीर पणे सुरू असलेले मांस विक्रीचे दुकान(Parbhani Purna Municipal Corporation)पालीका प्रशासनाने कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी शहरातील डॉ.नागनाथ झुंजारे व डॉ.सुधीर जैस्वाल यांनी (ता.१४) रोजी पासून पालीकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
पूर्णा शहरात पोलीस ठाण्याच्या बाजुच्या रस्त्यावर असलेल्या डॉ. सुधीर जैस्वाल व डॉ.झुंजारे यांच्या रुग्णालया बाजुला एका मांस विक्रेत्याने मागील ३ वर्षांपूर्वी बेकायदेशीर रित्या मांस विक्रीचे दुकान सुरू केले आहे. डॉ.झुंजारे यांनी याप्रकरणी वेळोवेळी प्रशासनाला तक्रार, निवेदन देत सदरील दुकान परिसरातील घाण, दुर्गंधी,लक्ष वेधले होते.परंतु प्रशासनाने संबंधिता विरोधात कुठलीही कारवाई न केल्याने अखेर बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या मांस विक्री दुकानदार म.शाहेर म.ताहेर कुरेशी यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सदरील प्रकरणी डॉ.झुंजारे यांच्या बाजूने निकाल दिला आहे.यानंतर पालीका प्रशासनाने सदरील दुकान कायमस्वरूपी बंद करणे बाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही.यामुळे डॉ.नागनाथ झुंजारे व डॉ.सुधीर जैस्वाल यांनी पालीके समोर (ता.१४) रोजी सकाळ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.उपोषस्थळी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते पक्ष संघटनांच्या वतीने सदरील उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला.यावेळी आ. डॉ.गुट्टे काका मित्र मंडळाचे तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम, घनदाट मामा मित्र मंडळाचे दयानंद कदम,मा.नगरसेवक संजय(पापा)काकडे, कासव ग्रुपचे मुन्ना राठोड, सामाजिक कार्यकर्ते राजु नारायणकर,राजु सेन, वंचितचे तुषार गायकवाड,प्रहारचे किशोर सूर्यवंशी,जय चंदन, सतीश नारायणकर आदींची उपस्थिती होती.

तर संबंधितावर गुन्हा दाखल करणार-पालीका प्रशासन
पूर्णा शहरातील जेष्ठ डॉ.झुंजारे व डॉ.जैस्वाल यांच्या उपोषणात शहरातील मान्यवरांनी पालीका प्रशासनासोबत चर्चा घडवून आणली प्रशासनाने सदरील दुकानादारास रितसर नोटीस बजावली असून, सदरील दुकान बंद केले आहे.तसेच दुकान सुरू केल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली असल्याचे समजते. पालीकेच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक मुमतेजीत खान, स्वच्छता निरीक्षक पारवे,जाकीर पठाण आदींची उपस्थिती होती.












