Gokulashtami श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त पुर्णेत शुक्रवारी गवळणींचा जंगी सामना

Spread the love
पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)श्रीकृष्ण जन्माष्टमी (Gokulashtami festival purna)निमित्त येथिल स्वस्तिकनगर भागातील भगतसिंग चौकातील तेजबंद कुटुंबीयांद्वारे शुक्रवारी (ता.१५)ऑगस्ट रोजी सायं ८ वाजता भव्य गवळणींचा जंगी सामना तसेच शनिवारी महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक बाबुअप्पा तेजबंद, मारोतराव तेजबंद यांनी दिली आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोकुळाष्टमी सणाला पुर्णा येथील तेजबंद कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून भव्य गवळणींचा जंगी सामना तसेच महाप्रसादाचे आयोजन करते.याहीवर्षी तेजबंद कुटुंबीयांनी शुक्रवारी गवळणींच्या सामन्याचे आयोजन केले आहे. गायीका मयुरी ताई खाडे हयातनगरकर व गायीका द्रौपदाताई लांभाटे तिरकसवाडीकर यांच्यात भव्य गवळणींचा जंगी सामना रंगणार आहे.यानंतर शनिवारी दुपारी १ ते ५ वाजे दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सुरेख नवं नविन गवळणींचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक बाबुअप्पा तेजबंद व मारोतराव तेजबंद यांनी केले आहे.

You cannot copy content of this page