आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे शेतकऱ्यांच्या बांधावर लिमला व कात्नेश्वर महसूल मंडळात अतीवृष्टी;शेत पिकांचे मोठे नुकसान

Spread the love

पुर्णा ता.१५(प्रतिनिधी)

तालुक्यातील लिमला व कात्नेश्वर महसुली मंडळातील बहुतांश गावांमध्ये अतीवृष्टीच्या पावसाने शेत पिंकाचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. शुक्रवारी (ता.१५) रोजी मतदारसंघाचे आमदार.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शेतीच्या नुकसानीची पहाणी करुन प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.. यावेळी प्रशासनाचे उप विभागीय अधिकारी जिवराज डापकर , तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या सह महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

पूर्णा तालुक्यांत गुरुवारी मध्यरात्री लिमला व कात्नेश्वर महसूल मंडळातील अनेक गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. ढगफुटीसदृश्य अतिमूसळधार पडलेल्या या पावसाची गणक यंत्रावर लिमला ८८.८ मिमी तर कात्नेश्वर मंडळात ७२.८ मीमी.पावसाची नोंद झाली आहे.तुफान कोसळलेल्या या पावसामुळे परिसरात पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.खरीप हंगामातील मुख्य पिके सोयाबीन, कापूस, तूर , मूग हातातोंडाशी आलेली पिकांचे नुकसान झाले आहे.

Oplus_16908288

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे हे आज अतीवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी लिमला महसूल मंडळातील माहेर,मुंबर,धानोरा काळे,देवठाणा,देऊळगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर सकाळच्या सुमारास हजर होते.यावेळी भाजपचे नेते बालाजी रुद्रवार यांच्या सह संबंधित ठिकाणीचे सरपंच, गुट्टे मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रशासनाचे उप विभागीय अधिकारी जिवराज डापकर , तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार थारकर, कृषी अधिकारी भालेराव,मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक आदींची उपस्थिती होती.यावेळी आ.डाॅ. गुट्टे यांनी प्रशासनाला नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबतही संवाद साधला.यावेळी बोलताना ते म्हणाले की, नुकसानीचे पंचनामे पुर्ण होताच अवहाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनास पाठवावा मी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करून भरपाई मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page