विशेष आमंत्रण;दहीहंडी महोत्सवाला यायचं हं..!जिल्हाप्रमुख विशाल कदम
पुर्णेत शिवसेना (शिंदे)गटाचा उपक्रम
पूर्णा ता.६(प्रतिनिधी)शिवसेना शिंदे गटाच्या शहर व तालुका शाखेच्या वतीने आज रविवारी शहरातील जुना मोंढा बाजार मैदानावर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन,या सोहळ्यास जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर, प्रमुख उपस्थिती मा.आ. रामप्रसाद बोर्डीकर, आमदार संतोष बांगर,आनंद भरोसे, सुरेश भुमरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे,तरी अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी केले आहे.
पुर्णा शहरात (ता.१७) ऑगस्ट रोजी सायं ६ वाजण्याच्या सुमारास भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन, सुमारे १ लाखांहुन अधीक रोख रक्कमेचे पारितोषिके विजेत्या संघाला देण्यात येणार असल्याची माहिती आहे.या महोत्सवात प्रथम पारितोषीक विजेत्या संघाला ५५ हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह, व्दितीय पारितोषीक ३१ हाजार रोख व सन्मान चिन्ह तर तृतीय स्थानी असणा-या संघास २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.दहीहंडी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, यासाठी तालुका प्रमुख प्रकाश क-हाळे, शहरप्रमुख अँड.विशाल किरडे,युवा नेते गणेश कदम व सचिन पप्पु कदम, लक्ष्मण कदम,अँड दिनेश पवार, दत्ता कदम, कैलास मुळे, शरद कदम, प्रा.बंटी खाकरे,रामजी भालेराव आदीं पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
भव्य स्वरुपात आयोजन करण्यात आलेल्या दहीहंडी महोत्सवात जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा. शहरात प्रथमच होत असलेल्या भव्य दहीहंडी सोहळ्यास पुर्णा शहर व तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी केले आहे.












