Parbhani Collector रघुनाथ गावडे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर;पुर्णेतील अतीवृष्टीने पण नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी

Spread the love

नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना आदेश

पुर्णा ता.१७(प्रतिनिधी)मागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाची संतधार सुरू असल्याने अनेक भागात अतिवृष्टीचे नोंद झाली आहे.( Parbhani collector reached the farmer’s dam & inspected the area affected by the heavy rain in Purna Rural Areas)पूर्णा तालुक्यातील लिमला,ताडकळस, कात्नेश्वर महसूल मंडळात अतिवृष्टी होऊन उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी महसूल अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रविवारी (दि. १७)सकाळी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रभावित झालेल्या या भागाची पाहणी केली.

पूर्णा तालुक्यातील लिमला, कात्नेश्वर ,ताडकळस परिसरात अतीवृष्टी झाली आहे.परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लिमला महसुल मंडळातील दगडवाडी, वझर, देवठाणा, देऊळगाव दुधाटे, धानोरा काळे, मुंबर, माहेर, बानेगाव, फुलकळस इत्यादी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष शिवारातल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार पूर्णा माधव बोथीकर, कृषी अधिकारी भालेराव,मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील आणी सर्व संबंधित शेतकरी हजर होते. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी धानोरा काळे शिवारातील शेतकऱ्यांसह भरपावसात चिखल तुडवत थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अवहाल पाठविण्याच्या सुचना देखील केल्या आहेत

दरम्यान धानोरा काळे येथे वणारसबाई शंकर काळे या महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले त्यांची जिल्हाधिकारी गावडे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली.त्यांची गरीब परिस्थिती, राहायला घर नाही, पावसाने झालेले पत्र्याचे घराचे नुकसान, कुटुंबात कोणी करता नसल्याचे पाहून त्यांनी तात्काळ पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करत घरकुल देण्यासाठी मदत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यातील तत्पर माणुसकी, आपुलकी पाहून वणारसबाई शंकर काळे यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. त्यांची व्यथा समजून घेतल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी यांचे हात जोडून आभार मानले.

You cannot copy content of this page