Mock Drill सण- उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुर्णा पोलीसांची चित्त थरारक प्रात्यक्षिके

Spread the love

बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज, अश्रू धुर,गार्ड, हेल्मेट सुसज्ज पोलीस;पहाणा-यांना धडकी

पूर्णा ता.१९(प्रतिनिधी)Mock drill;आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुर्णा पोलीस प्रशासन सज्ज झाले Purna Police Newsआहे.शहर व हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविता यावे, यासाठी (ता.१९) ऑगस्ट रोजी येथील रेल्वे स्थानकाच्या मैदानावर शहरात पोलिसांचे ‘मॉक ड्रिल’ आयोजित करण्यात आले होते.

पुर्णा शहरातील रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी सकाळी अचानक पोलीसांकडुन बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज, अश्रू धुर, नळकांड्या फोडल्या, गार्ड, हेल्मेट सुसज्ज पोलीस पहाणा-यांना धडकी भरेल अशी पोलीसांनी केलेली एकापेक्षा एक सरस प्रात्यक्षिके बुधवारी पुर्णा शहरातील नागरीकांच्या दृष्टीक्षेपात पडली.मात्र ही घटना कोणतीही दंगल वगैरे काही नसुन ती सण उत्सव काळात अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हातळण्यासाठी पोलीसांकरीता केलेली कवायत होती.येथिल उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रात्यक्षिकांचा सराव पार पडला. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जमावाला नियंत्रित करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सोमेश्वर शिंदे,गजानन पाटील व श्रीमती रेखा शहारे, फौजदार श्रीनिवास पडलवार,प्रकाश इंगोले,आमेर चाऊस, सुरजीत सिंग माळी,वाल्मीक भोसले,सोनेराव जाधव ,पुणेकर, यांच्या सह जमादार श्याम काळे, रमेश मुजमुले, श्याम कुरील, मनोज नळगीरकर, रमाकांत टोटेवाड, बंडू राठोड,हजेरी मेजर तोंडेवार ,पोका,संदिप चौरे,अजय माळकर, सुरेश राठोड,शेंबेवाड, टाकरस यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी, महिला व पुरुष होमगार्ड आणि परभणी पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होती.या सरावामुळे पोलीस दलाची सण-उत्सवासाठीची तयारी अधिक मजबूत झाली असून, कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे दिसून आले.

You cannot copy content of this page