जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी पुर्णेतील १६ खेळाडूं पात्र

Spread the love

विद्या प्रसारणी सभा शाळेच्या खेळाडूंचे यश

पुर्णा ता.२०(प्रतिनिधी)

नुकतेच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत विद्या प्रसारिणीच्या १४,१७,१९ वर्षं वयोगटातील तब्बल १६ खेळाडूंनी विजय संपादन करत परभणी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ ठरवली आहे.विजय खेळाडूंचे प्रक्षिक्षकांचे संस्था अध्यक्ष डॉ.विनय वाघमारे, मुख्याध्यापक देविदास उमाटे व शिवदर्शन हिंगणे यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी व महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांचे निकाल हाती आले असून,पूर्णा येथिल विद्या प्रसारणी शाळेचे (१४ वर्षं) गटातुन हर्षवर्धन तुकाराम ढोणे,क्षितिजा प्रदीप कापसे, सृष्टी मंचकराव नवघरे,(१७ वर्षे) गटातुन सार्थक मुकुंदराव मोरे, सय्यद आयान सय्यद शबिर,वेदांत युवराज गव्हाणे,विराज महेंद्र गोणारकर तर (१९ वर्षं) गटात सम्यक रामेश्वर ढाकरगे, शेख उजेब शेख जावेद, स्वप्निल पवन कुमार सूर्यतळ, उजेरखान मोहसीन खान पठाण,अनोमा रत्नदीप एगडे, शरयू राजकुमार जोंधळे, नताशा संजय चव्हाण,प्राप्ती मुकुंद भोळे,शेख रफीक उद्दीन मजरुद्दीन या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत यश मिळवत आगामी काळात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.या स्पर्धेसाठी खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रकाश रवंदळे व क्रीडा मार्गदर्शक सज्जन जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page