गणेश व्याख्यानमालेचे आयोजन
गणेश व्याख्यानमालेचे आयोजन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही २८ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर या कालावधीत कर्मचारी गणेशोत्सवा अंतर्गत गणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर व सचिव कमलाकर चौसाळकर यांनी दिली.
व्याख्यानमालेत दि.२८ ऑगस्ट रोजी सोलापुर येथील समीर गायकवाड हे आपण वाचतोय का?हा विषय मांडणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी कऱ्हाड येथील इंद्रजित देशमुख हे पसायदान या विषयी भाष्य करणार असून, ३० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मिताली रांदड (राठी) आनंदाचे विज्ञान याविषयी आपले विचार मांडतील. ३१ ऑगस्ट रोजी नांदेड येथील सुरेश कुलकर्णी हे गणेशोत्सव व जनजागृती या विषयी बोलणार आहेत ०२ सप्टेंबर रोजी परभणी तील राजन क्षीरसागर हे मराठवाड्यातील सिंचन व विकास संधी आव्हाने या विषयावर मनोगत व्यक्त करतील. नांदेड येथील प्रा.डॉ. संतोष कोटूलवार हे ०३ सप्टेंबर रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वातंत्र्य चळवळ याविषयी तर, ०४ सप्टेंबर रोजी प्रा.डॉ. विजय पोहनेरकर, रविंद्र मगर हे आसु आणि हसु कार्यक्रम सादर करतील ०५ सप्टेंबर रोजी मुंबई लोकमतचे संपादक यदू जोशी हे महाराष्ट्रातील आजचे राजकारण या विषयाने व्याख्यानमालेचा समारोप करतील.
योगेश्वरी महाविद्यालयतील नागापुरकर सभागृहात सायं ६.३० वा.होणाऱ्या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर,सचिव कमलाकर चौसाळकर, समन्वयक प्रा.डॉ.गणेश पिंगळे,मार्गदर्शक रमण सोनवळकर, संयोजक प्राचार्य रमण देशपांडे, आयोजक मुख्याध्यापिका अपर्णा पाठक, आदीसह गणेशोत्सव समितीच्या सदस्यांनी केले आहे.












