स्व.सितारामअप्पा एकलारे(अण्णा) यांच्या पाचव्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

Spread the love
पूर्णा ता.२५(प्रतिनिधी);स्व.सितारामअप्पा बाबारामअप्पा एकलारे (अण्णा) यांच्या ५ व्या स्मृतीदिनी रक्तदान शिबीर व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.यावेळी सुमारे ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.पूर्णा येथील श्री.गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात सोमवारी (ता.२५) रोजी रक्तदान शिबीर व वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.सिताराम अप्पा एकलारे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.याप्रसंगी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज प्रमुखवक्ते डॉ.नामदेवराव दळवी (वसमत),उत्तमरावजी कदम(कोषाध्यक्ष), जेष्ठ संचालक साहेबरावजी कदम, डॉ. विनयजी वाघमारे, नितीनजी काबरा, संतोषअप्पा एकलारे यांची प्रमुख उपस्थिती. तसेंच संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदराव कदम, संचालिका सौ. भाग्यलक्ष्मी प्रमोद एकलारे, सौ.स्मिताताई अमृतराज कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार उपप्राचार्य डॉ.गजानन कुरूंदकर,व डॉ.शिवसांब कापसे,उप्राचार्य चारुदत्त डाफणे, डॉ.रवी बरडे डॉ.राजू शेख, डॉ.दैवशाला कामठाणे, जीवन आधार ब्लडबॅंकचे अधिकारी साईनाथ चौधरी यांची उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते डॉ.नामदेवराव दळवी यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की श्रद्धेय सितारामआप्पा एकलारे यांनी पूर्ण परिसरातील गोरगरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय निर्माण करून आजच्या पिढीला शिक्षणाची द्वारे उघडून त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे.श्रद्धेय सितारामअप्पा एकलारे याचे धार्मिक कार्य मोठे असून त्यांचा परिवार त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत असल्याचे डॉ.वाघमारे यांनी सांगितले.
डॉ.विनयजी वाघमारे यांनी रक्तदान शिबिराचे महत्व सांगून एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी रक्तदान करण्यासाठी सहभाग घ्यावा.यावेळी मान्यवरांच्या हस्ते आहे. एकलारे कुटूंबाच्या वतीने सामाजिक जाणीवेतून ११००० हजाराची देणगी महाविद्यालयातील करियर गाईडन्स अँड प्लेसमेंट सेलला देण्यात आली. गुरु डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य, अमृतराज कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.के. राजकुमार यांनी तर .सूत्रसंचालन उपप्राचार्य चारूदत्त डाफने, आभार डॉ. ओमकार चिंचोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षेत्तर कर्मचारी विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page