जिंतूर तालुक्यातील चांदज शिवारात गुप्तधन काढणारी टोळी बोरी पोलिसांकडून जेरबंद…!
परभणीतील बोरी पोलिसांची चांदज गावात गावठाण मध्ये कारवाई…!
परभणी ता.२६(प्रतिनिधी): Parbhani(Bori)PoliceNews: गुप्तधन काढणारी एक ८ जणांची टोळी बोरी पोलीसांच्या जाळ्यात अडकली असुन, परभणीच्या जिंतुर तालुक्यातील चांदज शिवारात घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.स्मशानुमीच्या ठिकाणी खड्डा खोदताना या टोळीला (ता.२५) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ पकडून जेरबंद केले आहे.. या प्रकरणात बोरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादुटोणा अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.
जिंतूर तालुक्यातील जुने चांदज गावात गावठाण परिसरात काही इसम गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने तंत्रमंत्र विद्या करुन खड्डा खोदत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सपोनि. सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. घटनास्थळावरून शेख खाजा,संतोष घोडसे, उध्दव सुमुकवार, विठ्ठल जाधव पुरुषोत्तम पदमगिलवार, इब्राहिम खान,जमीर खान, शेख अन्वर,यांना ताब्यात घेऊन जेरबंद केले.पोलिसांना घटनास्थळी काही संशयीत वस्तू आढळून आल्या. गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने सदर प्रकार केला जात असल्याचे स्पष्ट जाणवते.याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रकाश मोरे यांच्यावर बोरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास बोरी पोलीस करत आहेत.











