मुसळधार पावसामुळे काही रेल्वे रद्द तर काहींचे मार्ग वळवले
पुर्णा ता.२८(प्रतिनिधी);हैदराबाद विभागातील भिकनूर – तळमडला सेक्शन तसेच अक्कनपेट – मेडक सेक्शन या मार्गांवर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग वळविण्यात आले आहेत. तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या – गुरूवारी (दि. २८) सुटणाऱ्या काचेगुडा – नागसरोल (17661), काचेगुडा – नरखेड (17641), नांदेड – मेडचल (77606) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच शुक्रवारी (दि. २९) सुटणाऱ्या नागसरोल – काचेगुडा (17662) व नरखेड – काचेगुडा (17642) या गाड्याही रद्द राहतील.
मार्ग वळविण्यात आलेल्या गाड्या –
साईनगर शिर्डी – तिरुपती (17418) ही गाडी परभणी – परळी वैजनाथ – विकाराबाद मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच काचेगुडा – भगत की कोठी (17605) ही गाडी काचेगुडा – मौला अली जी – काझीपेट – पेड्डपल्ली बायपास – करीमनगर – निजामाबाद या वळण मार्गे चालविण्यात येईल.
आंशिक रद्द गाड्या – गुरूवारी (दि. २८) निजामाबाद – तिरुपती रायलसीमा एक्सप्रेस (12794) ही गाडी निजामाबाद – सिकंदराबाद दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे, तर नांदेड – विशाखापट्टणम (20812) ही गाडी नांदेड – चारलापल्ली दरम्यान रद्द करण्यात आली असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
नांदेड -जम्मू तावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस ची एक फेरी रद्द
जम्मू विभागातील झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या परिचालन वर परिणाम झाला आहे, यामुळे – उद्या दिनांक 29 ऑगस्ट रोजी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक 12751 हुजूर साहिब नांदेड – जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 31 ऑगस्ट रोजी जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक 12752 जम्मू तावी – हुजूर साहिब नांदेड हमसफर एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.











