राष्ट्रीय क्रिडा दिनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली व खेळाडुंना सन्मान
विद्या प्रसारणी शाळेत क्रिडा दिनाचे आयोजन
पुर्णा ता.२९(प्रतिनिधी);येथिल विद्या प्रसारणी शाळेत राष्ट्रीय क्रिडा दिनी मेजर ध्यानचंद यांच्या सृमीत आदरांजली अर्पण करून नवोदित खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
पुर्णा येथिल विद्या प्रसारणी शाळेत संस्थेचे अध्यक्ष डॉ.विनय वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रिडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी श्रीनिवासजी काबरा, डॉ.हरिभाऊ पाटील, मुख्याध्यापक देविदास उमाटे, शिवदर्शन हिंगणे, मुख्याध्यापिका श्रीमती अतिया बेगम, शेख जब्बार, पाराशर स्वामी, आदींची उपस्थिती होती.प्रसंगी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नुकतेच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या अनोमा रत्नदीप एगडे,वेदांत युवराज गव्हाणे, उजेरखान मोहसीन खान पठाण,रिंकी डोंगरे या खेळाडुंसह क्रिडा प्रशिक्षक मार्गदर्शक प्रकाश रौंदळे, सज्जन जैस्वाल सत्कार करण्यात आला.












