शेत रस्त्याच्या वादात ५० वर्षीय शेतकऱ्याची हत्या
पुर्णा तालुक्यातील मौजे कळगांव येथिल घटना ;ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल
पुर्णा ता.३०(प्रतिनिधी); Tadkalas Kalgav Murder Newsशेतातुन जाण्यासाठी रस्ता का दिला नाही याचा राग मनात धरून दोघांनी एका मिळुन शेत शेजारी शेतकऱ्यांसह कुटुंबीयांना जबर मारहाण केली.या घटनेत एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला असुन, दोघे जणं गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुर्णा तालुक्यात पोलीसांचा वचक कमी झाल्याने की काय या महीन्यात खुनाच्या ५ घटना घडल्या आहेत.पुर्णा, झिरोफाटा, धनगर टाकळी फाटा, हिवरा(बु), पाठोपाठ शुक्रवारी (ता.२९) रोजी रात्री तालुक्यातील मौजे कळगांव येथेही रस्त्याच्या वादातून खुन झाल्याची घटना उघडकीस आली आहे.विलास उत्तमराव शिंदे वय 50 राहणार. ढवळगाव जिल्हा हिंगोली ह.मु. कळगाव शिवार गट नंबर 169 तालुका पूर्णा असं त्या मयत इसमाचे नाव आहे सदरील तुम्हाला त्याच्या आजीची जमीन मिळाली असल्याने तो कळगाव शिवारातील आपल्या मागील काही दिवसापासून शेतात राहत असल्याचे समजते.त्यांचे शेत शेजारी कुबेर दादाराव माने व कैलास साहेबराव होनमने यांची देखील शेती आहे. त्या दोघांच्या शेती मधून जाणाऱ्या रस्त्याबाबत यांच्यामध्ये वाघ सुरू होता. हा वाद शुक्रवारी (ता.२९)विकोपाला गेला. कुबेर व कैलास याने संगणमत करून रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास विलास शिंदे त्याची सिंदुबाई विलास शिंदे,मुलगा जयश्री व मुलगा चंद्रकांत शिंदे या दोघांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.घटनेत कुबेर माने याने शेत रस्त्याचा वाद मनात धरून मयत विलास शिंदे यांच्या पोटात चाकु घुसवला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर घटनेत त्याची पत्नी व सुन गंभीर जखमी झाले.दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात मयताचा मुलगा चंद्रकांत शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुरनं २२५/२५ कलम १०३(१), ११८(१), (२), ३(५) भा.न्या. संहीता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास ताडकळस पोलीस करत आहेत.












