Ambejoai माजी पोलीस निरिक्षक सुनील नागरगोजे यांची आत्महत्या.!
परळी तालुक्यातील नागदरा येथील मुळ रहिवासी; आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट
अंबाजोगाई ता.२(प्रतिनिधी):Ex.Police Inspector Suside Newsपोलिस दलातील माजी पोलीस निरिक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय ५७) यांनीAmbejogai अंबाजोगाई येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (ता.०१) रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना धक्कादायक उघडकीस आली असून,घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सुनील नागरगोजे हे मूळ परळी तालुक्यातील नागदरा येथील होत. अनेक वर्षांच्या सेवेनंतर मागील काही महिन्यांपूर्वी ते नोकरीतून त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. नुकतेच त्यांनी अंबाजोगाई येथील घर बांधकामासाठी पाडल्याने ते प्रशांत नगर येथे किरायाने राहत होते.महालक्ष्मीसणासाठी कुटुंबीय मुळ गावी गेल्यावर त्यांनी घरात एकटे असताना त्या ठिकाणीच त्यांनी सोमवारी रात्री घरात कोणी नसताना सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह स्वा.रा.तीर्थ रुग्णालयात पाठवून दिला आहे. दरम्यान, सुनील नागरगोजे यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
सुनील नागरगोजे सेवेतून बडतर्फ
सुनील नागरगोजे यांनी पोलीस खात्यात कार्यरत असताना परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली होती. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता. मात्र, परभणी येथे कार्यरत असताना पोलीस अधीक्षकांशी झालेल्या वादातून शिवीगाळ प्रकरण उभं राहिलं आणि त्यावर चौकशी सुरू झाली. यानंतर त्यांची बदली बीड येथे नियंत्रण कक्षात करण्यात आली. तिथेही त्यांनी एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. या पार्श्वभूमीवर, एप्रिल २०२५ मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फीनंतर नागरगोजे हे नैराश्यात गेल्याची माहिती समोर आली आहे.











