Pdcc Bank Parbhani News बँक खाते बंद होऊ नये म्हणून तात्काळ केवायसी करा.!

Spread the love

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व सभासद, शेतकरी व खातेदारांना आवाहन

परभणी, पुर्णा ता.४ (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँक खाते सक्रिय ठेवण्यासाठी केवायसी अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व सभासद, कास्तकार, शेतकरी व खातेदारांना आधारकार्ड व पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत तात्काळ संबंधित शाखेत जमा करण्याचे आवाहन केले आहे.

केवायसी न केल्यास खातेदारांना व्यवहारात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा बँकेने दिला आहे. तसेच खातेदारांनी आपल्या खात्यावर वारसाची नोंदणी करून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचा लाभ घ्यावा, असे बँकेचे अध्यक्ष सुरेश अंबादासराव वरपुडकर, उपाध्यक्ष व राजेश साहेबराव पाटील व संचालक मंडळाने आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page