पुर्णेत खा.संजय जाधव यांच्या हस्ते श्रीराम गणेश मंडळाची महाआरती व लक्षद्वीप सोहळा

Spread the love

भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न

पुर्णा ता.६ (प्रतिनिधी):Parbhani Purna Ganesh Festival News शहरातील मानाच्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या श्रीराम गणेश मंडळातर्फे शुक्रवारी (ता.५) सायंकाळी भव्य महाआरती व लक्षद्वीप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या सोहळ्याला शिवसेना उबाठाचे उपनेते MP Sanjay Jadhav परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते ‘श्रीं’च्या चरणी महाआरती अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा प्रमुख विशाल कदम, माजी नगरसेवक संतोष एकलारे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, शहरप्रमुख मुंजा भाऊ कदम, माजी नगरसेवक श्याम कदम, युवा नेते मनोज उबाळे, प्रा.गोविंद कदम, अमृतराज कदम, उपतालुकाप्रमुख बालाजी वैद्य, गोविंद सोलव, मुन्ना भैय्या राठोड, राजु माने, शिवा पाथरकर, विकास वैजवाडे, गजानन हिवरे, जगदीश जोगदंड, केदार पाथरकर, बालाजी शिरगोळे, शशिकांत गौर शेट्टे, रत्नाकर एकलारे, प्रदीप ननवरे,प्रा.गंगाधर खाकरे,तसेच साक्षी जाधव, वेदांत जाधव, हर्षवर्धन दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या वतीने प्रमोद ऊर्फ राजुअण्णा एकलारे, अजय एकलारे, अविनाश यसके, सर्वेश एकलारे, चंदु कापसे, गोविंद खिल्लारे, बालाजी एकलारे, वैभव फुलारी, सुमित वसमतकर, आदित्य नागठाणे, रोहित एकलारे, वेदांत कापसे, गुरुप्रसाद सोनटक्के, प्रसाद वाघमारे, ऋषिकेश एकलारे, प्रद्युम्न कदम, राहुल कदम आदींनी आगंतुक मान्यवरांचे स्वागत व सन्मान केला.यावेळी खासदार संजय जाधव यांच्या हस्ते लघुउद्योजक यसके दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात आला. महाआरतीनंतर झालेल्या लक्षद्वीप सोहळ्यात महिलाभाविकांनी पारंपरिक पद्धतीने दिवे लावून संपूर्ण परिसर भक्तीमय केला.

oplus_131072

मंडळाचा सामाजिक उपक्रमांचा वारसा………………. श्रीराम गणेश मंडळ गेल्या ४२ वर्षांपासून पुर्णा शहरात गणेशोत्स काळात धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवित असून, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसोबतच आकर्षक देखावे हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे. तसेच समाजसेवेचा वारसा जपत मंडळाच्या वतीने ‘स्वर्गरथ’ सेवा पुर्णेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

You cannot copy content of this page