इदे मिलाद्दुन नबी निमित्त पूर्णेत रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांच्या स्पर्धा संपन्न
पूर्णा, ता.५ (बातमीदार) : इदे मिलाद्दुन नबी सणानिमित्त जामा मस्जिद समोरील मैदानावर खिदमत फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (ता.५) रक्तदान शिबिरासह विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जगदीश जोगदंड यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर पेशईमाम हाफिज रशीदसाहब बरकती, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, प्रकाश कांबळे, संतोष एकलारे, उत्तम खंदारे, ॲड. एम.ए. सईद, दादाराव पंडित, फारूक सौदागर, मोहम्मद शफीक, मौलाना जाकीर कुरेशी, अकबरखान पठाण, शेख जावेद, मुक्ती बिलालसाहब, अली अन्सारी, अजीम नाज, इनामदार कादरी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये प्रवीण कनकुटे, साहेबराव सोनवणे, ॲड. प्रदीप भवरे, प्रदीप नन्नवरे, अब्बास खान, शेख युनुस, सय्यद आजम, शेख रफीक, मुजफ्फर खान यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रौफ कुरेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. अथरोद्दीन अंसारी यांनी मानले.या सामाजिक उपक्रमातून तरुणांमध्ये रक्तदानाची जाणीव निर्माण झाली असून, धार्मिक सण सामाजिक ऐक्य व सेवाभाव जोपासण्यासाठी उपयोगी ठरू शकतात, असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.












