महावितरणकडून ग्राहकांना ऐन पावसाळ्यात‘ईमर्जन्सी लोडशेडींग’चा शॉक..!
पुर्णा शहर व तालुका दिड तासांपासून अंधारात
पूर्णा (प्रतिनिधी) : महावितरणने पुर्णा शहर व तालुक्यातील नागरिकांना सोमवारी (ता.९) रोजी दिवेलागणीच्या वेळी अचानक ‘ईमर्जन्सी लोडशेडींग’चा शॉक दिला आहे.ऐन पावसाळ्यात लोड शेडींग घेतली जात असल्याने ग्राहकांतुन संताप व्यक्त केला जात आहे.
१३२ उपकेंद्रातुन सायं ७ वाजल्यापासून संपूर्ण शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून,तब्बल तास दिड तासभरांपासुन बत्तीगुल झाल्याने नागरिक,व्यापारी,तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले आहेत.अचानक वीजपुरवठा बंद पडल्याने व्यवसायधारकांचे व्यवहार ठप्प झाले. घरगुती कामकाज विस्कळीत झाले, तर विद्यार्थ्यांची ऑनलाईन शैक्षणिक कामेही अर्धवट राहिली.तसेच वीज नसल्याने शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलचा पुरवठा खंडित झाल्याने बुधवारी शहरातील पाणी पुरवठा ही विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून येथिल महावितरणचा कारभार पुरता ढेपाळला आहे.सतत विद्युत पुरवठा खंडित होणे ही नित्याचीच बाब झाली आहे.त्यातच आता कोणतीही पुर्वसुचना न देता‘ईमर्जन्सी लोडशेडींग’केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीत आणखीनच भर पडल्याचे दिसून येत आहे. व्यक्त होत आहे. “नेमके कोणत्या कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाला, आणि पुन्हा कधी सुरू होणार?” या प्रश्नांची उत्तरे मात्र अद्याप मिळालेली नाहीत.ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारचे ‘‘ईमर्जन्सी लोडशेडींग’लादल्यामुळे महावितरण विरोधात संताप व्यक्त होत आहे.,












