Nanded; श्री.गुरु गोविंदसिंगजी विमानतळा वरील विमानसेवा पुन्हा सुरू…!
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश;धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण;डीजीसीएकडून मान्यता
नांदेड ता.९(प्रतिनिधी) Nanded Airport News नांदेडकरांसह परभणी हिंगोली करांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.नांदेड येथिल श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळावरील विमानसेवा १० सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) स्थगिती आदेश मागे घेतले असून, विमान कंपन्यांनीदेखील बुकिंगसाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
का झाली होती बंद सेवा..? नांदेड येथे अतीवृष्टीच्या पावसाने येथिल विमानतळावरील धावपट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते.संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी विमान प्राधिकरणाने(ता.२२)ऑगस्ट रोजी पासून येथील सेवा थांबवण्याचा निर्णय घेत. विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा आदेश दिला होता.
जिल्हाधिकाऱ्यांची पुढाकाराने उचललेली पावले नांदेड जिल्हाधिकारी यांनी ही बाब गांभीर्याने घेत तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण केले. कोणताही गाजावाजा न करता केवळ कामावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे DGCA कडून सेवा पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली.
आता काय..?
- १० सप्टेंबरपासून नांदेड विमानसेवा सुरू
- विमान कंपन्यांनी बुकिंग सुरू केले
- प्रवाशांमध्ये समाधान व उत्साह
नांदेडकरांसाठी ही सेवा पुन्हा सुरू होणे म्हणजे प्रवासासाठी सोय व वेळेची बचत होणार आहे.











