पाऊसपाणी ;पुर्णा तालुक्यात आहेरवाडीत घर कोसळले;गाय मृत्युमुखी, २ पशुधन जखमी

Spread the love
 पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथे (ता. १३)सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या सततच्या पावसामुळे गावात मोठे नुकसान झाले असून,थुनानदी काठावरील शेत पिकांसह शिवारातील बहुतांश पिकं पाण्याखाली गेली आहेत.तर एका शेतकऱ्याच्या घराचा एक भाग कोसळून एक दुभती गाय जागीच दगावली तर आणखी दोन पशुधन गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.
मागील महीना भरापांसुन पुर्णा तालुक्यात सततच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. पावसाने आॅगस्ट महीन्यातच वार्षिक सरासरी ओलांडली आहे.शेत पिकांत पाणी घुसले असुन खरिप हंगाम हातचा गेला आहे.तर अनेक ठिकाणी घरांची पडझड तसेच पशुधनाची हानी देखील झाल्याची नोंद आहे.
शनिवारी १३ रोजी सायं तालुक्यातील मुरलीधर किशनराव मोरे यांच्या घराचा भाग कोसळुन घरांपाठीमागे संभाजी नारायण मोरे यांची बांधलेली तीन गोवंशाची जणांवरांपैकी एक गाय मृत्युमुखी पडली तर दोन गायी जखमी झाले आहेत. घटना समजताच छगणराव मोरे (पं.स. सदस्य, पूर्णा गंगाधर मोरे (ग्राम पंचायत सदस्य), सुभाष मोरे (ग्राम पंचायत सदस्य), सदाशिव मोरे, जगन्नाथ मोरे, संभाजी मोरे तसेच मुरलीधर मोरे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी मिळून जखमी जनावरांना उपचारासाठी मदत सुरू केली आहे. दरम्यान, तलाठी प्रतिनिधी यांनीही सदर ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला असून घटनास्थळीचे फोटो काढून संबंधित विभागाला सादर केले आहेत. त्यामुळे शासनाकडून पीडित कुटुंबास तातडीने मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील अनेक घरांना भगदाडे पडले असून अशा दुर्घटनांची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन बाधित कुटुंबांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

You cannot copy content of this page