पूर्णेत मंगळवारी “व्दिदशकपूर्ती” सामाजिक बांधिलकी दिनाचे आयोजन

Spread the love

तथागत मित्र मंडळाचा उपक्रम

पूर्णा ता.१५(प्रतिनिधी) येथिल तथागत मित्र मंडळ, पूर्णा यांच्या वतीने समाजहिताच्या कार्याला समर्पित “द्विदशक पूर्ती सोहळा” सामाजिक बांधिलकी दिन व नेत्ररोग तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, (ता.१६) सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, आंबेडकर नगर, पूर्णा येथे पार पडणार आहे

पुर्णा येथिल तथागत मित्र मंडळाच्या वतीने याहीवर्षी उत्तम मुगाजी खंदारे (मा. उपनगराध्यक्ष तथा गटनेते, पूर्णा) यांचा जन्मदिवस सामाजिक बांधिलकी दिन म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे. पूज्य भदंत डॉ. उपगुप्तजी महारस्थविर (महासचिव, अखिल भारतीय भिक्खू संघ, बुद्दधम्म शाळा, महाराष्ट्र प्रदेश),पूज्य भदंत पंचवांश (बुद्ध विहार, पूर्णा) यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मंगळवारी कार्यक्रमाच्या निमित्ताने महेरु आंधळीकाम, धनगर टाकळी यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर, आयोजित करण्यात आले आहे.तरी समाजबंधुंनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक‌ तथागत मित्र मंडळाच्या वतीने केले आहे.

You cannot copy content of this page