Parali Vaijanth जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी संतोष साखरे, उपाध्यक्षपदी पवन सुरवसे, तर कार्याध्यक्षपदी विठ्ठल साखरे यांची निवड
परळी वैजनाथ (ता.१७ प्रतिनिधी) शहरातील फुले चौक व देशमुख गल्ली परिसरातील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची व्यापक बैठक मुख्य मार्गदर्शक वैजनाथराव सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाबरोबरच मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी संतोष साखरे, उपाध्यक्षपदी पवन सुरवसे तर कार्याध्यक्षपदी विठ्ठल साखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
- मिरवणूक प्रमुख : दीपक देशमुख, रवी जाधव, बाळासाहेब देशमुख, नितीन झिरपे
- सचिव : चैतन्य पानखडे
- सहसचिव : ओम जाधव
- प्रसिद्धी प्रमुख : पांडुरंग जाधव
- कोषाध्यक्ष : पवन साखरे
- सहकोषाध्यक्ष : उमेश वाकडे
- व्यवस्थापक : स्वप्निल सुरवसे, बळीराम साखरे, विकास कदम
- • ३८ वर्षांची परंपरा कायम • गेल्या ३८ वर्षांपासून या मंडळाच्या वतीने आदिमाया आदिशक्तीचा नवरात्र उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांसह विधायक उपक्रम राबवून परिसरात उत्सवी आणि आनंदी वातावरण निर्माण केले जाते.
निवडीनंतर अध्यक्ष संतोष साखरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी मंडळाच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. परिसरातील भाविक व नागरिकांचा सहभाग वाढवून नवरात्र उत्सव अधिक भव्य करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”यावेळी पार पडलेल्या बैठकीस मार्गदर्शक व सल्लागार वैजनाथराव सोळंके, शरदराव चव्हाण, रमेश जाधव, श्रीराम लांडगे, संजय कदम, ज्ञानोबा सुरवसे, पांडुरंग साखरे, पांडुरंग पानखडे, रामराव सुरवसे, विष्णू साखरे, पद्माकर जाधव, विजय जाधव, नरहरी सुरवसे, ज्ञानोबा सरोदे, दिनेश परळीकर, सुरेश साखरे, तुकाराम वाकडे, महादेव जाधव, विनोद देशमुख यांच्यासह मंडळाचे सदस्य व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.











