“स्वस्थ नारी सशक्त परिवार”अभियानाचा परभणीत शुभारंभ..!

Spread the love

महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी-पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी,ता.17(प्रतिनिधी)‘Healthy Woman, Empowered Family’ campaign was inauguration“स्वस्थ नारी सशक्त परिवार” या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ आज परभणीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाला. मध्यप्रदेशातील धार येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अभियानाचा राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झाला असून त्याचे थेट प्रक्षेपण परभणीतील कार्यक्रमात दाखविण्यात आले.
परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर Guardian Minister Meghnatai Bordikar.  म्हणाल्या,की, “कुटुंबातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहते. त्यामुळे महिलांनी नियमित तपासणी करून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.”दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून महिला, मुली व बालकांच्या आरोग्य तपासणीसोबतच आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरांत संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांची तपासणी करून आवश्यक त्या उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ग्रामीण व शहरी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या केल्या जाणार आहेत. पालकमंत्रींनी आशासेविकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “आशा स्वयंसेविका निस्वार्थ भावनेने काम करून गावांचे आरोग्य चांगले ठेवतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. मधुमेही रुग्णांना घरपोच औषध किट दिले जात आहे.
परभणीत आतापर्यंत 16 हजारांहून अधिक किट वितरित झाल्या आहेत. तसेच महाराष्ट्राला टीबीमुक्त करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ”कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, डॉ. सदानंद भिसे, डॉ. नागेश लखमावर, डॉ. संजयकुमार पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. नागेश लखमावर यांनी केले तर सूत्र संचालन डॉ. मोडक यांनी केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, आशासेविका आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


You cannot copy content of this page