Parbhani महापालिकेत कचरा टाकून केलं अनोखे आंदोलन

Spread the love

शहरातील कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती गणेश देशमुख यांचा इशारा

परभणी ता.२२ (प्रतिनिधी)
शहरातील वाढत्या कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी परभणी महानगरपालिकेचे माजी सभापती गणेश देशमुख यांनी सोमवारी (दि.२२) थेट मनपा मुख्यालयात कचऱ्याने भरलेला ट्रक आणून टाकत अनोखे आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले असून त्यातून दुर्गंधी, कीटकांचा प्रादुर्भाव आणि रोगराईचा धोका वाढला आहे. नागरिकांना त्रास होत असतानाही मनपाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

देशमुख यांनी निवेदनात म्हटले की,

  • शहरातील कचरा गोळा करण्याची प्रक्रिया नियमित करावी,
  • कचरा संकलनासाठी पुरेशी वाहने व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत,
  • कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची प्रभावी व्यवस्था उभारावी.

यापुढेही ही समस्या न सुटल्यास शहरभरातील कचरा एकत्र करून थेट महानगरपालिका आवारात टाकण्याचा कठोर इशाराही त्यांनी दिला.या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाला धसका बसला असून तातडीने बैठक घेऊन उपाययोजना सुरू करण्याची चर्चा सुरु झाली आहे.

You cannot copy content of this page