पुर्णेत ‘नमो युवा मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ६०० धावपटूंचा सहभाग

Spread the love

अमरावतीचा प्रतीक गेडाम,वैष्णवी वानखेड,पुर्णेची गौरी भोसले, नांदगावचा वैभव भालेराव ठरले प्रथम विजेते

पुर्णा,ता.४ (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत पुर्णा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘नमो युवा मॅरेथॉन’ स्पर्धेत तब्बल ६०० हुन अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. शहरातील रस्त्यांवर उसळलेल्या या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ही स्पर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. उद्घाटन सोहळ्यास भाजप नेत्या प्रेरणाताई वरपुडकर व केदार कटिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. अँथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली.
🔹 १५ ते १८ वर्षे गटात

  • मुलींत प्रथम – वैष्णवी वानखेड (अमरावती), द्वितीय – वर्षा कदम (परभणी), तृतीय – किरण सोळंके (पुर्णा)
  • मुलांमध्ये प्रथम – प्रतीक गेडाम (अमरावती), द्वितीय – दीपक काचगुंडे (नरसिंह पोखरणी), तृतीय – साद शेख सलीम (पेडगाव)
    🔹 १४ वर्षाखालील गटात
  • मुलींत प्रथम – गौरी भोसले (पुर्णा), द्वितीय – अपेक्षा पानझाडे (मानवत), तृतीय – संस्कृती भालेराव (नांदगाव)
  • मुलांत प्रथम – वैभव भालेराव (नांदगाव), द्वितीय – गण्या कटिंग (परभणी), तृतीय – योगेश बोबडे (पुर्णा)

  • विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रेरणाताई वरपुडकर, केदार खटींग, भाजयुमो जिल्हाध्यक्ष प्रभाकर शिंदे, जि.प. सदस्य रामकिशन रौंदळे, बळीराम कदम, अनंता पारवे, सुनिल डुबेवार, डॉ. अजय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
    स्पर्धेतील पंच म्हणून माधव शेजुळ, रणजीत काकडे, क्रीडा अधिकारी कल्याण पोले, सज्जन जयस्वाल यांच्यासह अनेक क्रीडा शिक्षकांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा नेते लक्ष्मीकांत कदम, शहराध्यक्ष राज ठाकर, क्रीडा मार्गदर्शक सज्जन जयस्वाल व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page