परभणीत इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचा एल्गार…
परभणीत इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचा एल्गार…
परभणी/प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेलची दरवाढ दररोज होत असल्याने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. महागाईचा भडका उडू लागला आहे. पेट्रोलचे दर शंभर रूपयांवर पोहचण्याची शक्यता आहे. तर डिझेल व गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या इंधन दरवाढीच्या विरोधात परभणीत शिवसैनिकांनी बैलगाडी मोर्चा काढुन रस्त्यावर मोटारसायकल ढकलून केंद्र शासना विरोधात घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी ५ रोजी निवेदन दिले.
शिवसेनेने काढलेल्या बैलगाडी मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम व संजय ढगे यांनी केले.या पुकारलेल्या मोर्चात जिल्हाभरातुन शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. रस्त्यावर उतरले होते.
यावेळी डॉ विवेक नावंदर,राम खराबे, सखुबाई लटपटे,कुसुम पिल्ले वाड,सविता मठपती ,माणीक पोंढे, सदाशिव देशमुख, रविंद्र धर्मे,प्रदिप खेडेकर, अर्जुन सामाले,दिपक बारहाते, विष्णु मुकुटे, काशिनाथ काळबांडे, अनिल सातपुते, हनमंत पौष माणीक घुमरे, शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम,जितेश गोरे,शेख शब्बीर, विलास अवकाळे , माऊली धस यांच्या सह हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.












