परभणी सह जालना व बुलढाण्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी..!

Spread the love

परभणी सह जालना व बुलढाण्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी..!
आरोग्य मंत्री ना.टोपे यांची पत्रकांना माहीती..
परभणी प्रतिनिधी/
जालना, बुलढाणा व परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.यासह राज्यात आणखी किती वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी द्यायची यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीअंती धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी शुक्रवारी दि.5 रोजी येथे पत्रकार परिषदेत दिली.
टोपे म्हणाले, जालना, बुलडाणा, व परभणी जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. मी मंत्री झाल्यानंतर उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रत्यक्ष मान्यता दिली आहे. उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालासृ मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू होतील.
हिंगोली, गडचिरोली जिल्हेही महाविद्यालय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत,मात्र अशा जिल्ह्यांना थोडे थांबावे लागेल.कारण एका ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारायचे झाल्यास सुमारे सातशे कोटी रुपये खर्च करावे लागतात. अर्थसंकल्पात एवढी आर्थिक तरतूद करणे शक्य नाही. त्यामुळे जवळ वैद्यकीय महाविद्यालय आहे, अशा जिल्ह्यांनी थोडे थांबावे, जिल्हा रुग्णालयांत अधिक सुविधा द्याव्यात, असा विचार सुरू आहे. मात्र, यासंदर्भात नेमका काय निर्णय घ्यायचा, मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव कधी ठेवायचे आदींवर चर्चेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यात किती नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करावीत, याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही ना.टोपे म्हणाले.

You cannot copy content of this page