“सरकारचे दडपशाहीचे धोरण चुकीचे”;शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा-खा.संजय जाधव

Spread the love

शक्तीपीठ महामार्गावरून सिंगणापूर फाट्यावर रस्तारोको

परभणी, ता. २३ (प्रतिनिधी)

“ज्या जमिनीवर शेतकऱ्यांची जीवजिविका अवलंबून आहे, ती जमीन दडपशाही करून हिरावून घेणे हे सरकारचे दडपशाही धोरण चुकीचे आहे,” असा घणाघात खासदार संजय जाधव यांनी केला. पिढ्यान् पिढ्या मालकी हक्काच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा सणसणीत आरोप त्यांनी यावेळी केला. “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यावरच अन्याय होऊ देणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार,” असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

परभणी जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, सोमवारी (ता.२३)सकाळी सिंगणापूर फाटा येथे शासनाच्या दडपशाही धोरणाविरोधात मोठ्या संख्येने शेतकरी, महिला व विविध राजकीय पक्ष- संघटनांच्या कार्यकर्ते रस्तारोको आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.दरम्यान रविवारी सहजपुर(जवळा) येथे शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी दरम्यान आलेल्या प्रशासकीय अधिकारी पोलिस यांच्यात बाचाबाची झाली होती.पोलीसांनी परिसरातील काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले होते.यावेळी आंदोलनात महिलांचा मोठा विरोध केला होता.महीलांशी पोलीसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सदरील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेना उबाठा व स्थानिक शेतकऱ्यांनी सिंगणापुर फाटा येथे सकाळी रास्तारोको आंदोलन केले.यावेळी आंदोलनात शेकडो शेतकरी, महीला विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधीकारी उपस्थित होते.

प्रसंगी बोलताना काही महीलांनी प्रतिक्रिया दिल्या “आम्ही दरवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी पाठवतो; पण एक भाऊ म्हणून त्यांनी अशी वागणूक देणे वेदनादायक आहे,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली. दीड हजार रुपयांच्या आमिषाने जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी महिलांशी गैरवर्तन केल्याचा मुद्दा आंदोलनात जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. त्या घटनेचा निषेध नोंदवून जबाबदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसादजी आणेराव,व रविंद्र धर्मे,मुंजाभाऊ कुकर, रितेश काळे, काशिनाथ काळबांडे, किशोर ढगे, आदीं स्थानिक पातळीवरील विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page