परळी महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकलीचा खांबाला चिकटून मृत्यू
परळी/प्रतिनिधी
परळी महावितरणच्या मनमानी व हलगर्जीपणामुळे एका सहा वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना आज दि9 रोजी दुपारी 03:45 च्या सुमारास घडली आहे. या घटनेने नागरिक संतप्त झाले असून पुन्हा पुन्हा सांगूनही करंट उतरणार्या पोलची दुरुस्ती केले नसल्यामुळे ही घटना घडली आहे. या घटनेत दोषीवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भागातील नागरिकांनी केली आहे.
महावितरण कार्यालयाच्या अगदी पाठीमागील बाजूस असलेल्या हबीब पुरा भागातील रस्त्यावर असलेल्या विजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसापासून करंट उतरत असल्याचे नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला पुन्हा पुन्हा कळवले. तरीही या भागातील नागरिक नेहमी या खांबा पासून दूर राहत असत मात्र आज अतिशय दुर्दैवी घटना घडली असून या भागातील एक छोटी सहा वर्षीय मुलगी गौरी वैजनाथ घोटकर वय सहा वर्ष ही खांबाच्या संपर्कात आली व करंट बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला.
या बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सदरील घटनेत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे अशी या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.