परभणी कोरोना ब्रेकींग…
परभणी कोरोना ब्रेकींग…
इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद……
परभणी/प्रतिनिधी
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शनिवारी (ता.२० रोजी)निर्गमित केले आहेत.
परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच काही शाळांमध्ये शिक्षणक पॉझिटीव्ह आलेले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी बजावले आहेत. इयत्ता दहावी व बारावीला शिकविणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी नियमित शाळेत अध्यापनाचे कार्य व आवश्यकती कामे करावित. इतर सर्व शिक्षकांनी शाळेत पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.












