आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडला परभणीत तहसिलदारांची मंगलकार्यालय मालकावर ५० हजारांची दंडात्मक कार्यवाही..
आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडला परभणीत तहसिलदारांची मंगलकार्यालय मालकावर ५० हजारांची दंडात्मक कार्यवाही..
परभणी/प्रतिनिधी
कोविड-१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात लागु असलेल्या आपत्ती व्यवस्थापनकायद्याची शहरातील धार रोडवरील एका फंक्शन हॉलच्या मालकाने प्रशासकीय आदेश डावलून कार्यक्रमाची पुर्व परवानगी न घेताच कार्यक्रम घेतल्या प्रकरणी मंगलकार्य मालकावर परभणी तहसिलदारांकडून ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून जिल्हयात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ लागू केला आहे. दि.१७ फेब्रुवारी २०२१ रोजी शहरातील धार रोडवरील गोल्डन फंक्शन हॉल येथे पॉपूलर फ्रंट ऑप इंडीया परभणी या संघटनेचा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजकाने प्रशासनाची परवानगी न घेता परराज्यातील राज्यातील व परभणी शहरातील ३ ते ४ हजार संख्येने नागरीक व स्वयंमसेवकांची गर्दी जमवण्यात आली सदरची कृती कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार वाढविणारी व साथरोग वाढण्यास कारणीभूत आहे.त्याअर्थी मोहम्मद मुदस्सीर जहीर अहेमद,गोल्डन फंग्शन हॉल परभणी गोल्डन फंक्शन हॉल धार रोड परभणी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांना प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता पॉपूलर फ्रंट ऑप इंडीया परभणी या संघटनेचा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजनास फंग्शन हॉल उपलब्ध करुन दिल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार वाढविणारी व साथरोग वाढण्यास कारणीभूत ठरणारी कृती केल्या मूळे मोहम्मद मुदस्सीर जहीर अहेमद, गोल्डन फंग्शन हॉल परभणी यांना ५० हजार रुपयांचा दंड लावण्यात आला असून अशी कृती दुसऱ्या वेळेस केल्यास व नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास सदर फंग्शन हॉल विशिष्ठ कालावधी करीता सिल करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे….












