परभणीत मोर्चे,निदर्शने,रास्ता रोको,उपोषण,धरणे आदीं आंदोलनावर बंदी…

Spread the love

परभणीत मोर्चे,निदर्शने,रास्ता रोको,उपोषण,धरणे आदीं आंदोलनावर बंदी…
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे आदेश…
परभणी/ प्रतिनिधी
जिल्ह्यात कोविड-19 चा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील विविध पक्ष संघटना यांचेकडून आयोजित केले जाणारे मोर्चे निदर्शने रास्ता रोको उपोषण धरणे सभा आदीं आंदोलनावर बंदी घालत असल्याचा आदेश परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवार ता.२२ रोजी निर्गमित केला आहे.ह्या आंदोलन कर्त्यांना रोखण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस प्रशासनास सोपवली असल्याचे नमूद केले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार लागू करण्यात आलेल्या नियमावली नुसार जिल्ह्यातील विविध पक्ष संघटना यांचेकडून आयोजित केले जाणारे मोर्चे निदर्शने रास्ता रोको उपोषण धरणे सभा आदीं आंदोलनावर बंदी घालत असल्याचा आदेश परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवार ता.२२ रोजी जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासनास निर्गमित केले आहे.

You cannot copy content of this page