महादेव मंदिराच्या खोदकामात श्री गणेशाची दगडी मूर्ती सापडली.
वसमत तालुक्यातील इंजनगांव येथील घटना; दर्शनासाठी ग्रामस्थांची गर्दी; पुरातत्व खात्याने पहाणी करण्याची मागणी
वसमत/ (प्रतिनिधी)
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे श्री संगमेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे मंदिर परिसरात बांधकाम सुरू आहे बांधकामा दरम्यान खोदकाम करताना श्री गणेशाची दगडाची पुरातन मूर्ती आढळली आहे ग्रामस्थांनी गणेशाच्या मूर्तीचे पूजन करून मंदिर परिसरात स्थापना केली असून, ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली पुरातत्व खात्याने पहाणी करण्याची मागणी होत आहे.
वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथील संगमेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात बांधकाम सुरू आहे पुर्नबांधकाम दरम्यान मंदिर परिसरात खोदकाम करताना जमिनीतून एक प्राचीन मूर्ती आढळून आली आहे. ही मूर्ती गणपतीची असून ती दगडी आहे. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात नऊ दहा वर्षांपूर्वी सुद्धा खोदकाम चालू असताना खंडोबाची घोड्यावर बसलेली मूर्ती सापडली होती.इंजनगाव पश्चिम येथील संगमेश्वर महादेव मंदिर पुरातन मंदिर आहे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे खोदकामादरम्यान दोन वेळा मूर्ती सापडल्यामुळे पुरातन कालीन महत्व समोर येत आहे. श्री गणेशाची मूर्ती खोदकामात आढळल्याने ग्रामस्थ व तरुणांनी मृत्यू विधिवत पूजा करून मंदिर परिसरात स्थापना केली आहे.










