परभणीत गावठी पिस्टल व कट्टयासह १३ जिवंत काडतुसे हजारों रुपयांचे चरस गांजा जप्त..

Spread the love

परभणीत गावठी पिस्टल व कट्टयासह १३ जिवंत काडतुसे हजारों रुपयांचे चरस गांजा जप्त..
जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची धाडसी कार्यवाही…
परभणी/ प्रतिनिधी
येथिल कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चरस, गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तीन आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे कडुन गावठी पिस्टल व कट्टयासह १३ जिवंत काडतुसे हजारों रुपयांचे चरस गांजा जप्त केल्याची धाडसी कार्यवाही परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी करत तीघांना गजाआड केले आहे.
आज मंगळवार दि.२३/०२/२०२१ पोलीस अधिक्षक कार्यालय परभणी यांचेकडून प्रसिध्द
करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीत रेल्वे गेटजवळ साखला प्लॉट येथे शेख सोनु उर्फ शेख अमीर शेख ताहेर हा चरस, गांजा हे मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थाची विक्री करीत आहे तसेच तो सोबत अग्निशस्त्र वापरतो व शहरातील गुंड टोळयांना अग्निशस्त्रे बाहेर
राज्यातून आणून विक्री करतो. या गोपनीयन माहितीवरुन आज त्याचे राहते परिसरातील त्याचे
अड्डयावर पंच, तालुका दंडाधिकारी, सहायक पोलीस अधिक्षक श्री. अविनाशकुमार यांचेसह
रवाना होऊन त्याचे बैठकीची झाडती घेतली असता त्याच्या ताब्यातून पंचासमक्ष ३११ ग्रॅम चरस (
किंमत अंदाजे साठ हजार रुपये ) ५०० ग्रॅम गांजा ( किंमती अंदाजे पाच हजार ) तसेच सदर
इसमाचे चारचाकी वाहनातून एक गावठी पिस्टल च (१३) जिवंत काडतूस तसेच त्याचे बुलेट
गाडीच्या डिक्कीतून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत एकुण तीन
आरोपीकडून एकुण ६,४१,८००/- ( सहा लाख एकेचाळीस हजार,आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.जयंत मिना, अपर पोलीस
अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री.अविनाश कुमार, स.पोलीस निरीक्षक श्री.व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि श्री.गुलाब बाचेवाड,पोउपनि श्री. चंद्रकांत पवार, पोउपनि श्री.संतोष सिरसेवाड, पोउपनि श्री.विश्वास खोले, पोउपनि श्री. साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार सुग्रीय केंद्रे,हानुमंत जक्केवाड, निलेश भुजबळ, मधुकरचट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, बबन शिंदे, शंकर गायकवाड, अाहर पटेल, हरिचंद्र खुपसे,
दिलावरखान पठाण, दिपक मुदीराज, यशवंत वाघमारे, सय्यद मोबीन, शेख अझहर जाफर,
संतोष सानप, संजय घुगे, छगन सोनवणे, अरुण कांबळे, विष्णु भिसे श्रीमती आशा सावंत,उमा
पाटील यांनी केली आहे.

You cannot copy content of this page