खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते युनिक ब्युटीपार्लर व ट्रेनिंग सेंटरचा शुभारंभ
खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते युनिक ब्युटीपार्लर व ट्रेनिंग सेंटरचा शुभारंभ
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्हाच्या दबंग खासदार डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते युनिक ब्युटीपार्लर व ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. यावेळी संचालिका माधुरी कराड यांनी खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शहरातील कराड काँम्पलेक्स, जलालपूर रोड येथील नव्याने सुरू झालेल्या युनिक ब्युटीपार्लर व ट्रेनिंग सेंटरचे खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आज गुरुवार, दि.25.फेब्रुवारी रोजी शुभारंभ करण्यात आला. यावेळी माधुरी संपत कराड ,संपत एकनाथ ,मंचकराव मुंडे,डॉ.बाळासाहेब कराड, डॉ.शालिनी कराड,रमाकांत शेप,सिंधुताई शेप, डॉ.अंजली केंद्रे, डॉ.अजित केंद्रे,महेश मुंडे,डॉ गंगाधर डोंगरे यांची उपस्थिती होती. दरम्यान युनिक ब्युटीपार्लर व ट्रेनिंग सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी अनेकांकडून शुभेच्छा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












